चांदापुरी/पिलीव प्रतिनिधी | जनतेचा आसूड
चांदापुरी व पिलीव परिसरात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास सुमारे एक तास जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून, शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाची हजेरी अधूनमधून सुरू असून आज झालेल्या जोरदार पावसामुळे शेतातील पिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
पावसाची संततधार सुरू राहिल्यास परिसरातील शेतीसाठी मोठा फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर तसेच सखल भागात पाणी साचले आहे .
दरम्यान, पावसामुळे शेतकरी सुखावला असून “असाच पाऊस पुढील काही दिवस सुरू राहावा,” अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
— जनतेचा आसूड
