नवी दिल्ली : शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि परीक्षा पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या Cockroach Janta Party (CJP) च्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. उपोषणकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पोलिसांनी रुग्णालयात हलवले. मात्र, CJP ने ही कारवाई जबरदस्तीने करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर CJP संस्थापक अभिजीत दिपके यांनी बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनकर्त्यांनी 20 जुलै रोजी ‘संसद चलो‘ मोर्चाचे आवाहन केले आहे.
दरम्यान, संभाव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था केली असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, बॅरिकेडिंग आणि २४ तास देखरेखीची व्यवस्था करण्यात आली आहे. आंदोलनकर्ते मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असून शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी कायम ठेवली आहे.
या घटनेचे पडसाद संपूर्ण भारतभर दिसून येत आहेत . ठिकठिकाणी विविध पक्ष , संघटना आपला निषेध नोंदत आहेत व आंदोलनात सहभागी होत आहेत . महाराष्ट्र राज्यभरात विविध ठिकाणी या घटनेचे पडसाद पाहायला मिळाले . मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनात आंदोलणकर्त्याना अटक करण्यात आली आहे . सर्वच स्तरातून ,सोशल मीडिया तून लोक आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ,ही मागणी तीव्र होताना दिसत आहे .
