चांदापुरी | प्रतिनिधी
परिसरातील भारत गॅस ग्राहकांकडून एजन्सीच्या सेवेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. सिलिंडर वितरणात होणारा विलंब, बुकिंगनंतरही वेळेवर गॅस न मिळणे ,गॅस घरपोच सुविधा असताना सुद्धा घरी उपलब्ध न होणे तसेच ग्राहकांना समाधानकारक माहिती न मिळाल्याच्या तक्रारी पुढे येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
ग्राहकांनी सांगितले की, वेळेवर गॅस सिलिंडर उपलब्ध न झाल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. एजन्सीने ग्राहकांना वेळेवर आणि पारदर्शक सेवा द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच गॅस वजन करून देण्याची व्यवस्था एजेंसी ने करावी . तसेच गॅस बूकिंग असूनसुद्धा तो वेळेवर मिळत नाही .
गॅस एजेंसी ची कोणतीही सुरक्षा संदर्भात मदत अथवा माहिती व सेवा मिळत नाही .
यासंदर्भात संबंधित भारत गॅस एजन्सीने ग्राहकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन सेवा सुधारावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात आली आहे.
(टीप : संबंधित एजन्सी किंवा अधिकाऱ्यांची बाजू मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)
