प्रतिनिधी | जनतेचा आसूड
सामाजिक, शैक्षणिक, मानवाधिकार संरक्षण आणि जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. कुमार आनंदा लोंढे यांना सलग तीन दिवसांत तीन वेगवेगळ्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि सांगली जिल्ह्यातील विटा येथे झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये हा तिहेरी गौरव करण्यात आला.
पहिल्या दिवशी (दि :16/07/2026) अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे आयोजित कार्यक्रमात “परिवर्तनवादी पँथर पुरस्कार” प्रदान करण्यात आला. साप्ताहिक बंडखोर परिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी दंगलकार कवी नितीन चंदनशिवे, पँथर RPI चे राज्य नेते नंदकुमार केंगार, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासो धाईंजे, वैभव गीते, श्रद्धा जवंजाळ, आबा सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना डॉ . कुमार लोंढे ,डॉ . पंचशीला लोंढे
दुसऱ्या दिवशी (दि :17/07/2026) छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने डॉ. लोंढे यांना “समाजरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला. समाजसेवा, शिक्षण, मानवाधिकार संरक्षण आणि जनजागृती क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष साबीरजी आणि डॉ. जानरावजी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तिसऱ्या दिवशी ( दि : 18/07/2026) कराड येथील हुतात्मा अभंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. कुमार लोंढे यांना “सुवर्णनगरी गौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे वारसदार ॲड. सुभाष पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील फडतरे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी बोलताना डॉ. कुमार लोंढे यांनी, “सलग तीन दिवसांत मिळालेला हा तिहेरी सन्मान माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. समाजहित, शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक परिवर्तनासाठी अधिक निष्ठेने कार्य करण्याची नवी ऊर्जा या पुरस्कारांमुळे मिळाली आहे. हा सन्मान माझे सहकारी, मित्रपरिवार, कुटुंबीय, सर्व संस्था, पदाधिकारी, स्टाफ आणि माझ्यावर प्रेम व विश्वास ठेवणाऱ्या समाजबांधवांना समर्पित आहे,” असे सांगितले.
डॉ. लोंढे यांच्या या तिहेरी यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व मानवाधिकार क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
