दि 4 /09/2026
H1N1 आजारावरील उपचार सुरू असताना 52 वर्षीय पत्नीचे दुःखद निधन
चांदापुरी | प्रतिनिधी
चांदापुरी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गौरीहर बोडरे यांच्या पत्नीचे आज दुःखद निधन झाले. त्या 52 वर्षांच्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर H1N1 आजारावरील उपचार सुरू होते. त्यांच्यावर अकलूज येथील क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच चांदापुरी परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्ट असा परिवार आहे.
त्यांच्यावर आज सकाळी 11 वाजता चांदापुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भावपूर्ण श्रद्धांजली!
