चांदापुरी प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या दैनंदिन प्रवासाची सोय व्हावी, या उद्देशाने शेतकरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, चांदापुरी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने दरवर्षी हा अभिनव उपक्रम राबविला जात असून, यंदाही विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.

13 विद्यार्थ्याना पतसंस्थे द्वारे सायकल वाटप करताना मान्यवर
या कार्यक्रमाचे उद्घाटन सद्गुरु साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मा. भजनदास चोरमले, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी, पालक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी तेरा सायकल वाटप करण्यात आल्या . प्रताप सिह विद्यालय ,चांदापुरी ,11 विद्यार्थिनी व सदाशिवराव निवासी प्रशाला ,चांदापुरी 3 विद्यार्थी यांना सायकल देण्यात आली .
विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे संस्थेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

पहिल्या पासूनच मा . चेअरमन भजनदास चोरमले यांच प्राधान्य शिक्षण व त्यामधील येणाऱ्या अडचणी यासाठी असत . गेल्या कित्येक वर्षापासून असेच वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात . या उपक्रमाचे निश्चितच स्वागत आहे – मा. शाहीदभाई शेख , ता . अल्प सं . अध्यक्ष ,भाजपा
आमच्यासाठी नेहमीच आदरणीय असणारे मा . चेअरमन भजनदास चोरमले हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी शिक्षण घ्यावे ,प्रगती करावी याच मार्गदर्शन करतात व अडचणीत मदतही करतात . गेल्या 20 वर्षांपासून ते सामाजिक भान ठेऊन असे वेगवेगळे उपक्रम राबवतात याचा आम्हाला अभिमान वाटतो . सायकल वाटप ही संकल्पना कौतुकास्पद आहे – प्रवीण देठे , रिपाई अध्यक्ष ,चांदापुरी
माननीय माजी सरपंच आणि शेतकरी ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय भजनदास चोरमले आणि सर्व संचालक मंडळ कर्तव्यदक्ष मॅनेजर आपले सर्वांचे मनस्वी असे धन्यवाद आपण आमच्या शाळेतील प्रशालेतील विद्यार्थ्यांना सायकल देऊन विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केल्याबद्दल मनस्वी धन्यवाद
🙏🙏🙏
प्राचार्य/सर्व स्टाफ
सदाशिवराव निवासी प्रशाला व ज्यु कॉलेज चांदापुरी
संस्थापक डॉ.कुमार लोंढे
आपण शेतकरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ,चांदापुरी च्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम राबवून प्रत्येक वर्षी योजना राबवत असतो . यापाठीमागे ग्रामीण भागातील विद्यार्थी यांचा प्रवासाचा वेळ वाचावा व तो वेळ अभ्यासाला मिळावा हा उद्देश आहे . नक्कीच यापुढे देखील शिक्षणा साठी येणाऱ्या अडचणीसाठी संस्था व माझ्या माध्यमातून मदत करेन . समाजात देणाऱ्या लोकांची संख्या वाढावी ,हीच अपेक्षा आहे – चेअरमन भजनदास चोरमले
