चांदापुरी (ता. माळशिरस) : प्रतिनिधी
बाबासाहेब माने-पाटील मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 09 ऑगस्ट 2026 रोजी जि. प. प्राथमिक केंद्र शाळा, चांदापुरी येथे हे शिबिर पार पडले.

शिबिरामध्ये एकूण 458 नागरिकांची विविध आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच 101 नागरिकांना मोफत गॉगलचे वाटप करण्यात आले. नेत्रतपासणीदरम्यान 19 रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले असून, त्यांच्यावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या शिबिरात हृदयरोग, युरोलॉजी, नेत्ररोग, रक्त तपासणी, कॅन्सर तपासणी, महिलांची तपासणी आदी विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. काही रुग्णांची पुढील उपचारासाठी नोंदणीही करण्यात आली.
ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता. शिबिरासाठी आधुनिक वैद्यकीय उपकरणांचा वापर करण्यात आला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य सेवेला प्रतिसाद दिला.
या उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी बाबासाहेब माने-पाटील मित्र परिवार व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांचे आभार मानले असून, अशा प्रकारचे आरोग्य शिबिर नियमितपणे आयोजित करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली .


यावेळी गौतम आबा माने पाटील जि . प. सदस्य , ज्येष्ट नेते मच्छिंद्र आबा ठवरे , उपसभापति मनीषा मदने पाटील ,अमोल मदने पाटील ,पं स सदस्य रेश्मा माने पाटील ,युवा नेते आद . जीवन भैय्या जानकर , पं स सदस्य प्रवीण वाघमोडे ,ज्येष्ट नेते श्यामतात्या मदने ,आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाइंजे ,तुकाराम देशमुख , सरपंच जयवंत अण्णा सूळ ,केशव आबा पाटील ,उपसरपंच दीपाली निकम ,विकास सोसायटी चांदापुरी चेअरमन बापू लोखंडे ,विजयदादा पाटील ,भगवान बापू सूळ आदि उपस्थित होते .
शिबिराचे आयोजन बाबासाहेब माने पाटील व त्यांचा सर्व मित्र परिवार यांचे वतीने करण्यात आले .
