चांदापुरी प्रतिनिधी | जनतेचा आसूड
मतदार यादी विशेष सघन पुनरावलोकन (SIR) मोहिमेच्या अनुषंगाने बी.एल.ओ. (Booth Level Officer) यांना सहाय्य करण्यासाठी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस तसेच आशा सेविकांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात मा . सहा . मतदार नोंदणी अधिकारी तथा मा . तहसीलदार सुरेश शेजुळ साहेब यांनी दि : 1/07/2026 रोजी आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार संबंधित बी.एल.ओ. यांना घरभेटी, मतदार पडताळणी, आवश्यक माहिती संकलन तसेच SIR मोहिमेतील विविध कामांसाठी अंगणवाडी व आशा विभागातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
आदेशात मौजे चांदापुरी गाव भाग क्र. 202 साठी बी.एल.ओ. श्री. कोपनर जे. डी.आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका सौ. डायना अंकुश देठे, सौ. अनिता मसू गोरवे,आशा सेविका सौ. श्वेताली किरण देठे मदत करतील .
भाग क्र. 203 साठी बी एल ओ श्री. बोडरे अ. ए., व त्यांना सहायक म्हणून अंगणवाडी सेविका सौ.प्रियंका अण्णा भोसले, सौ.शाहिस्ता मोहसीन सय्यद, आशा सेविका सौ. आम्रपाली समाधान खरात नावे व संपर्क क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. संबंधित सर्वांनी SIR मोहिमेत समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तरी चांदापुरी गावातील सर्व नागरिकांनी एस आय आर प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा व आपली योग्य माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
जनतेचा आसूड या मोहिमेतील पुढील घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवून वाचकांपर्यंत अचूक माहिती पोहोचवत राहील.
