चांदापुरी (प्रतिनिधी): जनतेच्या समस्या, सामाजिक प्रश्न आणि स्थानिक घडामोडींना प्रभावीपणे वाचा फोडण्याच्या उद्देशाने ‘जनतेचा आसूड’ या डिजिटल वृत्तवाहिनीच्या अधिकृत पोर्टलचा शुभारंभ चांदापुरी येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास चांदापुरी गावचे लोकनियुक्त सरपंच श्री. जयवंत (अण्णा) सूळ, सोशल संस्था संस्थापक श्री. कुमार आनंदा लोंढे, भाजपा अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शाहिदभाई शेख, श्री. हनुमंत मिसाळ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) अध्यक्ष श्री. प्रवीण देठे तसेच जनतेचा आसूडचे संपादक राजू खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पोर्टलच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच जनसामान्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त केला. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अन्याय-अत्याचार तसेच स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडींना निर्भीडपणे वाचा फोडण्याचे काम हे पोर्टल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय, आपल्या व्यवसायाची, दुकानाची किंवा संस्थेची प्रभावी जाहिरात जनतेचा आसूड युट्युब चॅनेल व पोर्टलच्या माध्यमातून करण्याची सुवर्णसंधी स्थानिक व्यावसायिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘जनतेचा आसूड’ हे पोर्टल जनतेच्या हक्कासाठी परखड भूमिका घेणारे, निर्भीड पत्रकारितेचा वारसा जपणारे आणि २४ तास नागरिकांच्या सेवेत तत्पर राहणारे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

अतिशय छान आपण केलेल्या या प्रयत्नास हार्दिक हार्दिक शुभेच्छा